Top TRP Marathi Serial | सर्वात जास्त पाहिली जाणारी मालिका – Tula Pahate Re, Mazhya Navryachi Bayko

Top TRP Marathi Serial | सर्वात जास्त पाहिली जाणारी मालिका – Tula Pahate Re, Mazhya Navryachi Bayko

झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको आणि तुला पाहते रे या मालिकेमध्ये जोरदार टक्कर चालू आहे. यामध्ये सर्वश्रेष्ठ मालिका कोणती, असा प्रश्न प्रेक्षकांना पडत आहे. मराठी मालिकांमध्ये आजकाल खूप ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या मालिकांची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी जास्त होत असते. मालिकेच्या लोकप्रियतेवरून प्रत्येक आठवड्यात मालिकेची TRP कमी जास्त होत राहते. मालिकेची TRP ही जास्तीत जास्त मालिकेतील ट्विस्ट वर अवलंबून असते.

कोणती मालिका जास्त पाहिली जाते तर कोणती मालिका कमी पाहिली जाते हे आपल्याला मालिकेच्या TRP रेटिंग मुळे कळतं. तर आज आपण जाऊन घेऊयात कि मागच्या आठवड्यात कोणती मालिका TRP मध्ये अव्वल आहे.

यावेळेस जास्त TRP असलेल्या मालिका झी मराठी या चॅनेलचीच आहेत. नेहमीप्रमाणे माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने वर्चस्व गाजवलं आहे. या मालिकेत गुरु, राधिका आणि शनाया यांच्यात होणाऱ्या नोकझोकीमुळे ही मालिका प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे.

अगदी कमी काळात लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे तुला पाहते रे, या मालिकेत विक्रांत आणि इशाचं प्रेम दाखवलं आहे, ज्यामध्ये त्यांच्या वयात खूप फरक आपल्याला पाहायला मिळतो. या मालिकेत विक्रांत ईशासाठी  प्रेम व्यक्त करत आहे. आत्ता विक्रांत आणि इशाचं प्रेम समाज स्वीकारेल कि नाही. यामुळे ही मालिका प्रेक्षकांना गुंतुवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे.

तिसऱ्या क्रमांकावर आहे तुझ्यात जीव रंगला ही मालिका. ही मालिका देखील प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करीत आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका चौथ्या स्थानावर आहे. कारण या मालिकेत शिवाजी महाराजांचं देहावसान दाखवलं गेलं आहे. शंभू राजेंना रायगडापासून लांब ठेवण्यात आलं आहे. तसाच अष्टप्रधान मंडळाचं राजकारण देखील आपल्याला पाहायला मिळालं.

चला हवा येऊ द्या हा कॉमेडी शो पाचव्या स्थानी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *