कोणत्या मराठी मालिकेची TRP सर्वात जास्त आहे? Top TRP Marathi Shows

कोणत्या मराठी मालिकेची TRP सर्वात जास्त आहे? – Top TRP Marathi Shows

मित्रांनो तुम्ही रोज वेगवेगळ्या मालिका पाहता. तर आज आपण तुम्ही पाहत असलेल्या मराठी मालिकेतून टॉप ५ मालिका कोणत्या आहेत आणि सर्वात जास्त TRP असणारी मराठी मालिका कोणती आहे ते आज आपण पाहणार आहोत. मराठी मध्ये इतर अजून खूप साऱ्या मालिका आहेत पण आज आपण सर्वात जास्त TRP असणाऱ्या पाच मालिका पाहणार आहोत.

५ नंबरला आहे मिसेस मुख्यमंत्री मालिका. लागीर झालं जी हि मालिका संपली आणि त्याच्या ठिकाणी आली नवीन मालिका मिसेस मुख्यमंत्री. या मालिकेतील सुमी आणि ड्राइवर म्हणजेच समर पाटील यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूपच पसंत पडत आहे. त्यामुळे हि मालिका TRP मध्ये ५ नंबरला आहे. या मालिकेत आत्ता लवकरच समर आणि सुमीचं लग्न आपल्याला पाहायला मिळेल.

४ नंबरला आहे चला हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या हा कॉमेडी शो असल्यामुळे प्रेक्षकांची या शोला देखील खूपच पसंती आहे. खूप दिवसांपासून हा शो चालू आहे आणि हा शो नेहमीच टॉप TRP मध्ये असतो. या शो मधील भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांची कॉमेडी पाहताना प्रेक्षक अगदी खळखळून असतात. म्हणून हा शो आहे TRP मध्ये ४ नंबरला.

३ नंबरला आहे स्वराज्यरक्षक संभाजी मालिका. हि मालिका छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून या मालिकेच्या माध्यमातून डॉ अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराज किती शूरवीर होते, त्यांच्या जीवनात काय काय घडलं हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्यामुळे हि मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. प्रेक्षकांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे हि मालिका trp मध्ये नंबर ३ला आहे.

२ नंबरला आहे माझ्या नवऱ्याची बायको हि मालिका. या मालिकेला देखील एक नवीन वळण मिळाले आहे. गुरूला बेघर करून राधिका आत्ता सौमित्रशी लग्न करणार आहे. राधिकाच्या जीवनातील चढ उतार या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. शनाया देखील राधीकाचा बदला घेणार आहे आणि त्यामुळे हि मालिका अधिकच मनोरंजन करत आहे. त्यामुळे हि मालिका नंबर २ला आहे.

आणि सर्वात जास्त trp असणारी मालिका म्हणजे तुझ्यात जीव रंगला. या मालिकेने खूपच मोठं वळण घेतलं आहे. राणा मेल्यामुळे या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आणि टर्न आला आहे. राणा परत घरी येतो खरा पण राजा राजगोंडाच्या रूपात. राजाचं सोंग घेऊन राणा नंदिता वैनी आणि पप्याची वाट लावत आहे. प्रत्येक कामात अडथळा तो आणत आहे. राणा आत्ता पहिल्यासारखा भोळा राहिला नसून तो खूपच हुशार आणि चतुर झाला आहे. नंदिता आणि पप्यामध्ये भांडण लावून राणाने त्यांचा डाव हाणून पाडला आहे. आत्ता अजून मालिकेत पुढे काय घडणार? राणा नंदिताचा बदला कसा घेणार हे सर्व आपल्याला लवकरच या मालिकेत पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळेच हि मालिका TRP मध्ये अव्वल आहे.

तर मित्रांनो या मालिकेतून तुमची आवडती मालिका कोणती आहे हे आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *