Tula Pahate Re Twist | Vikrant Saranjame First Wife | Shilpa Tulaskar – मालिकेत होणार विक्रांत सरंजामे यांच्या पहिल्या पत्नीची एन्ट्री

Tula Pahate Re Twist | Vikrant Saranjame First Wife | Shilpa Tulaskar – मालिकेत होणार विक्रांत सरंजामे यांच्या पहिल्या पत्नीची एन्ट्री

 

तुला पाहते रे या मालिकेने TRP मध्ये उच्चांक गाठला आहे. या मालिकेत सुबोध भावे आणि गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहेत. या मालिकेत वयाचं कसलंही बंधन न दाखवता आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीवर विक्रांत खूप प्रेम करतो असं दाखवण्यात आलं आहे. ईशा देखील प्रेमाखातीर काहीही करायला मागेपुढे पाहत नाही. आत्ता पर्यंत या मालिकेत फक्त वर्तमानकाळ दाखवण्यात आलेला आहे, परंतु आत्ता विक्रांत सरंजामे यांचा भूतकाळ उलगडणार आहे. या मालिकेत खूप सारे ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

 

त्यातीलच एक ट्विस्ट म्हणजे विक्रांत सरंजामे यांची पहिली बायको कोण आहे? ती विक्रांतला का सोडून गेली? विक्रांत सरंजामे यांच्या पहिल्या बायकोची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. तुला पाहते रे या मालिकेच्या चाहत्यांना आत्ता खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. विक्रांतच्या पहिल्या बायकोची भूमिका कोण करणार याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना आहेच.

 

विक्रांत सरंजामे यांच्या पहिल्या पत्नीची भूमिका “शिल्पा तुळसकर” साकारणार आहेत. जेव्हा तुला पाहते रे या मालिकेचे Title Song आले होते तेव्हा त्या विडिओ मध्ये एक सावली दाखवली आहे. हि सावली दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून विक्रांत सरंजामे यांच्या पहिल्या पत्नीची आहे आणि हि भूमिका शिल्पा तुळसकर साकारणार आहेत.

 

शिल्पा तुळसकर यांनी आपल्या सोसिअल मीडिया अकाऊंट वर देखील या व्हिडिओची एक झलक आपल्या चाहत्यांसोबत Share केली आहे. तिच्या चाहत्यांनी देखील तिला तुला पाहते रे मालिकेत लवकरात लवकर पाहायची इच्छा व्यक्त केली आहे. आत्ता शिल्पा तुळसकर यांची एंट्री कधी होणार याची सर्वाना वाट पाहावी लागेल.

 

तर मित्रानो तुमचं या नवीन पात्राविषयी काय मत आहे ते कंमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त करा.

Tags: Tula Pahate re new entry, shilpa tulaskar entry in tula pahate re, tula pahate re, vikrant saranjame wife entry in tula pahate re, Subodh Bhave, Gayatri Datar, शिल्पा तुळसकर, तुला पाहते रे, सुबोध भावे, गायत्री दातार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *