माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील सौमित्रची आई आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री

झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको हि लोकप्रिय मालिका यशाच्या शिखरावर पोहचली आहे. एक सर्वसामान्य गृहिणी ते उद्योजिका असा राधिकाचा यशस्वी प्रवास या मालिकेत दाखवला आहे. हि मालिका खूपच महत्वाच्या वळणावर आलेली आहे कारण राधिका आणि सौमित्र यांचं लग्न आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मालिकेत सौमित्रच्या आईची एन्ट्री झाली आहे.

सौमित्रच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने कलाविश्वात तब्बल ४० वर्षांनी कमबॅक केलं आहे. तर आज आपण याच अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.

सौमित्राची आई म्हणून अभिनेत्री वंदना पंडित यांनी अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले आहे. वंदना पंडित तब्बल ४० वर्षांपूर्वी अष्टविनायक या मराठी चित्रपटात अभिनेता सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम केले होते. त्यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.

२१ वर्षांच्या असताना वंदना पंडित अष्टविनायक या मराठी चित्रपटात झळकल्या होत्या. नंतर त्यांनी मुक्ता, मणी यांसारख्या चित्रपटात देखील छोटछोट्या भूमिका साकारल्या आहेत. वंदना पंडित यांचे लग्नानंतरचे नाव वंदना शेठ असे आहे. त्यांच्या मुलीचे नाव ईश्वरी शेठ असे आहे.

वंदना पंडित यांचा पुण्यात व्यवसाय असल्या कारणाने त्या त्यामध्ये व्यस्त झाल्या. लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यवसाय यांमध्ये व्यस्त असल्यामुळे पुन्हा त्यांना अभिनय क्षेत्रात काम करता आले नाही. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील नानींची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहिता थत्ते या वंदना पंडित यांच्या खूप जवळच्या मैत्रीण आहेत.

जेव्हा त्यांची पुण्यात भेट झाली तेव्हा वंदना शेठ यांनी एखादी चांगली भूमिका भेटली तर मला पुन्हा एकदा अभिनयात काम करायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली होती आणि लगेच १५-२० दिवसानंतर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेसाठी सौमित्रच्या आईची भूमिकेबद्दल वंदना पंडित याना विचारण्यात आले. त्यांना हि भूमिका आवडल्यामुळे लगेच वंदना पंडित यांनी या भूमिकेसाठी होकार दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *