मग पद्मविभूषण का दिलात ?

मग पद्मविभूषण का दिलात ?

जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे, तसतसे राजकीय नेत्यांचे आणि पक्षांचे आरोप-प्रत्यारोप हे वाढत चालेले आहेत. प्रत्येकजण भाषणात विरोधकांवर कडाडून बरसत आहे. आता शरद पवार साहेबही एका मुलाखतीदरम्यान बरसले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना नरेंद्र मोदींनी पवार साहेबांवर गंभीर आरोप केले होते. शरद पवार यांना पाकिस्तानचा पाहुणचार चांगलाच भावलाय. त्यामुळेच पवारांना पाकिस्तानच कौतुक वाटत, अशा शब्दांत मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या आरोपाला शरद पवार यांनी देखील उत्तर दिलेलं आहे.

शरद पवार मोदींना उत्तर देताना म्हणतात, मी पाकिस्तान धार्जिणा वाटतो, तर मग मला भाजपा सरकारनं पद्मविभूषण पुरस्कार का दिला, असा प्रश पवारांनी मोदींना केला. पवार साहेब पुढे म्हणतात, पंतप्रधान हे एक वैधानिक पद आहे, त्यांच्याकडे योग्य माहिती मिळवण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यांनी योग्य माहिती घेऊन मगच वक्तव्य केलं असतं, तर ते मला आवडलं असत. पण पंतप्रधानच कोणतीही माहिती न गोळा करता बेछूट विधान करतात यावर काय बोलावं, असा टोला देखील त्यांनी मोदींना लगावला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *