कोथरूडमध्ये राष्ट्रवादीचा पाठिंबा मनसेला का?
राष्ट्रवादी काँग्रेसने कोथरूडमधील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे याना राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला. हा पाठिंबा जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. बरेच अटकले बांधली जात होती. त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येणार का? अशी चर्चा देखील होत होती. पण या चर्चेला अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे.
एका मुलाखतीदरम्यान अजित पवार म्हणतात, आघाडीच्या जागावाटपात कोथरूडमधील जागा ही राष्ट्रवादीला देण्यात आली. पण या जागेवर राजू शेट्टी यांच्या पक्षालाही या जागेतून निवडणूक लढवायची होती. पण मनसेने ही कोथरुडमधून उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे मनसेने पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीला गळ घातली. मग आघाडीचे सर्व पक्ष मिळून त्यावर चर्चा केली. त्यानंतर सर्वांनुमताने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे याना पाठिंबा देण्याचं ठरलं, असं अजित पवारांनी स्पष्टीकरण दिल.