म्हणून सलमान खान फ्लॅट मध्ये राहतो

म्हणून सलमान खान फ्लॅट मध्ये राहतो

बॉलीवूडचा सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून सलमान खानची बॉलीवूड इंडस्ट्रीत ओळख आहे. बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांमध्ये सलमान खान अग्रस्थानी आहे. कोट्याधीश असतानाही आलिशान बंगल्यात राहण्याऐवजी वांद्रे येथे छोट्याशा फ्लॅटमध्ये का राहतो, असा प्रश्न सलमानच्या चाहत्यांना पडला असेल. चाहत्यांना पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर खुद्द सलमान दिल आहे.

नुकतंच सलमानने एका चॅट शोला हजेरी लावली होती. या चॅट शोमध्ये सलमान खानला या संदर्भात विचारले असता सलमान म्हटला, मला माझ्या कुटुंबासोबत राहायला आवडत. माझ्यासोबत माझे आई बाबा राहतात म्हणून मला माझा फ्लॅट प्रिय आहे. मी त्यांना सोडून कोणत्याही बंगल्यात जाणार नाही. माझे संपूर्ण बालपण या फ्लॅटमध्ये गेलं आहे, असं सलमान म्हणतो.

मी लहानपणी बराच वेळ अपारमेंटच्या खालच्या गार्डनमध्ये खेळायचो आणि कधी कधी तिथेच झोपून जायचो. भूक लागली कि कोणाच्याही घरी जायचो. इथली सगळी घरे मला माझ्या घरासारखी वाटायची.या अपारमेंटशी माझ्या खूप आठवणी जोडलेल्या आहे. त्यामुळे हा फ्लॅट सोडून मी कुठंच जाणार नाही, असं सलमान खान म्हटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *