Zee Marathi Award 2018 | झी मराठी अवार्ड २०१८

Zee Marathi Award 2018 | झी मराठी अवार्ड २०१८

झी मराठी अवार्ड मध्ये झी मराठी वरील मालिका आणि कलाकारांचा गौरव करण्यात येतो. गुणवंत कलाकारांना बक्षिसे दिली जातात. झी मराठीवर हा कार्यक्रम दरवर्षी थाटामाटात पार पडतो. या वर्षीदेखील हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने पार पडला.

तुला पाहाते रे या मालिकेने सर्वात जास्त पुरस्कार मिळवून बाजी मारली आहे. फक्त दोन महिन्यातच या मालिकेने सर्व मालिकांना मागे सोडत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याच मालिकेची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

झी मराठी अवॉर्ड मध्ये कोणत्या मालिकेला कोणते आणि किती पुरस्कार मिळणार याची उत्सुकता कलाकारांसोबत प्रेक्षकांना देखील लागलेली असते. यावर्षी “लागीर झालं जी”, “तुझ्यात जीव रंगला”, “माझ्या नवऱ्याची बायको”, “तुला पाहाते रे”, “बाजी” आणि “स्वराज्यरक्षक संभाजी” या मालिकांमध्ये स्पर्धा रंगली होती.

तुला पाहाते रे या मालिकेने नऊ पुरस्कार पटकावले. विशेष म्हणजे हि मालिका ऑगस्ट मध्ये चालू झाली असून या मालिकेला फक्त दोनच महिने झाले आहेत. हि मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मालिका सुरु होण्याअगोदर लोकांना ती आवडेल कि नाही हाच सर्वात मोठा प्रश्न होता.

परंतु मराठी प्रेक्षकांना पण नवीन काहीतरी पाहायला मिळत आहे आणि ते याचा खूप आनंद घेत आहेत हे येऊन लक्षात येत आहे. तुला पाहाते रे या मालिकेत विक्रांत आणि यशाची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. या मालिकेत वयाच्या पलीकडे जाऊन प्रेम दाखवलं आहे. इशा विक्रांतपेक्षा निम्म्या वयाची आहे तरीही ते वयाचं कसलंही बंधन न पाळता एकमेकांवर खूप प्रेम करतात.

झी मराठी अवॉर्ड मध्ये माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने पाच पुरस्कार पटकावले. हे पुरस्कार दरवर्षी झी मराठी वरील मालिकेला आणि कलाकारांना दिली जातात.

 

Tags: Zee Marathi Award 2018, झी मराठी अवार्ड २०१८, Tula Pahate Re, Mazhya Navryachi Bayko, Lagir Zal ji, Swarajyarakshak Sambhaji, Baaji, Tuzhat jeev Rangala, लागीर झालं जी, तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको, तुला पाहाते रे, बाजी, स्वराज्यरक्षक संभाजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *