झी मराठी अवार्ड २०१९ मध्ये या मालिकेला मिळाले सर्वात जास्त पुरस्कार

झी मराठीवरील सर्वच मालिका खूप लोकप्रिय आहेत. त्यातीलच एक म्हणजे अग्गबाई सासूबाई हे मालिका. या मालिकेला चालू होऊन काहीच महिने झाले आहेत. पण तरीही ही मालिका लोकांच्या खूप पसंतीस उतरत आहे. या मालिकेने जवळपास अग्रस्थानी स्थान मिळवलं आहे. नुकताच दरवर्षीप्रमाणे झी मराठीचा ‘झी मराठी गौरव पुरस्कार ‘ हा सोहळा पार पडला. या सोहळ्यातही अग्गबाई सासूबाई या मालीकेने पाहिलं स्थान मिळवलं आहे. या पुरस्कार सोहळ्यात अग्गबाई सासूबाई या मालिकेला सर्वाधिक पुरस्कार मिळालेले आहेत.

अग्गबाई सासूबाई या मालिकेत निवेदिता सराफ, गिरीश ओक, तेजश्री प्रधान, रवी पटवर्धन, आशुतोष पत्की हे कलाकार मुख्य भूमीकेत आहेत. या कलाकारांची पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

अग्गबाई सासूबाई या मालिकेला मिळालेले पुरस्कार :

१) सर्वोत्कृष्ट सासू : आसावरी

२) सर्वोत्कृष्ट सून : आसावरी

३ सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (स्त्री) : मॅडी

४) सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत

५) सर्वोत्कृष्ट सासरे : आजोबा

६) सर्वोत्कृष्ट कुटुंब : कुलकर्णी कुटुंब

७) सर्वोत्कृष्ट मालिका

८) सर्वोत्कृष्ट जोडी : अभिजीत-आसावरी

९) सर्वोत्कृष्ट आई : आसावरी

अशा पद्धतीने अग्गबाई सासूबाई या मालिकेला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. 

Title: Zee Marathi Award 2019

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *